वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आमची कार्यपद्धती

नमस्कार मराठी मंडळी!

या संकेतस्थळावर आपले स्वागत. या संकेतस्थळावरील लेख वाचून आपली देखील या संकेतस्थळासाठी योगदान देण्याची इच्छा नाही झाली तरच नवल! आणि आम्हीही आपले स्वागतच करू, परंतु लेखनाची गुणवत्ता राखण्याच्या आणि अवांतर किंवा प्रक्षोभक लेखन टाळण्याच्या उद्देशाने या संकेतस्थळाच्या कार्यपद्धतीमध्ये इतर संकेतस्थळांच्या मानाने थोडा फरक आहे. आम्ही एक संपादक मंडळ तयार केले आहे. ज्यामध्ये आपल्यातीलच काही मंडळी सदस्य आहेत. सर्व लेखांचे आणि प्रतिक्रियांचे नियंत्रण सर्वस्वी संपादक मंडळाच्या हाती आहे. कालपरत्वे त्यावरील सदस्य बदलले जाऊ शकतात.

“मराठी मंडळी”चे सदस्यत्व घेतल्यानंतर, नंतर केव्हाही सदस्य प्रवेश करुन थेट आपल्या फळ्यावरून आपण येथे लेखन करावे. आपण ते लेखन जतन करताच ते संपादक मंडळाच्या मान्यतेसाठी सादर होईल. संपादक मंडळ ते लेखन शुद्धलेखन आणि गुणवत्तेच्या कसोटीवर पडताळून ते मान्य करतील. आणि मग आपले लेखन संकेतस्थळावर दृश्यमान होईल.

त्याव्यतिरिक्त ब्लॉगिंग आणि तत्संबंधी आपल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी आम्ही एक चर्चासत्र (फोरम) तयार केलेले आहे. आपण मुक्तपणे तिथे लेखन, प्रश्न, शंका आणि त्यांचे निरसन करू शकता. फोरमचा हेतू हाच आहे की, ब्लॉगिंग संदर्भात सर्व प्रश्नांचे एका ठिकाणी सर्वांना समजेल अशा भाषेत उत्तर मिळावे. चर्चासत्रावर जाण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक कराः
दुवाः मराठी मंडळी चर्चासत्र

याशिवाय तुम्ही आपापले ब्लॉग/संकेतस्थळे, “मराठी मंडळी ब्लॉगर्स”ला जोडू शकता, जेणेकरून तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावरील ताजे लिखाण “मराठी मंडळी ब्लॉगर्स” या पृष्ठावर कोणीही पाहू शकेल, व तुमच्या संकेतस्थळाला मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यास मदत होईल!

आम्हांस खात्री आहे आपण सहकार्य कराल आणि या संकेतस्थळास ऑनलाईन मराठी जगतात एक वेगळी उंची गाठून द्याल.

यासंबंधी आपल्या काही शंका असतील तर त्या आपण येथे विचारू शकता.

PG

मराठी मंडळी

कोणी मेकॅनीकल, कोणी संगणक तज्ञ कोणी ग्राफीक्स तर कोणी अजुन कोण. सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. पण सर्वांमध्ये एका गोष्टीचे साम्य आणि ते म्हणजे मराठी बद्दल प्रचंड आदर आणि मराठीतून लेखन करण्याची आवड. …. पुढे वाचा


Powered By Indic IME