वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

हिंदोळे मनाचे…

२ प्रतिक्रिया

तो दिवस अजुनही तसाच लक्षात आहे जेव्हा कळलं की माझ्या पोटात तू आलायसआणखी काही आठवड्यांनी तर व्यवस्थित डोकं, हात पाय असं सावलीसारख्या काढलेल्या लहानशा चित्रासारखं तुझं रुप पाहुन विश्वासच बसत नव्हता की अरे हे तर माझ्याच शरीरात वाढतंयमग एक चाळा सुरू झाला.वाटायचं प्रत्येकवेळी डॉक्टरने तुला दाखवावं. पण ते तसं नसतं मग पाचसहा महिन्याचा खरं उण्या म्हणजे वजा पाचसहा महिन्याचा म्हटलं पाहिजे तेव्हा तुला पाहताना तुझं ते अंगठा चोखणं पाहून पुन्हा एकदा मुग्ध झाले. आणि नंतर मात्र जसंजसं तुझं ते उणं वय वाढायला लागलं तशा बसणार्‍या लाथा अम्म्मलाथा नको फ़ार कठोर शब्द आहे तेतुझं ते ढोसणं आवडायला लागलं..आणि मग पोटाला हात लावुन तू आहेस का हे तपासणं हाही एक चाळाच..मला वाटतं त्या साडेआठ महिन्यांत मन फ़क्त तुझ्याच आठवणींच्या झोक्यावर झुलत होतंछोट्या छोट्या गोष्टी संध्याकाळी बाबांबरोबर, फ़ोनवर आज्जीबरोबर उगाळत होतेमैत्रिणींकडेही तेचकाय खाऊ?? तुला काय आवडेल?? व्यायाम सगळं काही तुझ्यासाठीरात्रीचे ज्युलीबरोबरचे ते वॉटर योगा म्हणजे तुझं फ़ेवरिट हे मलाही कळलं होतं..म्हणून तर हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत आपण तो क्लास बुडवला नाही

नंतर मग तू आलास तो क्षण म्हणजे तर काय हर्षवायुचतिथल्या सगळ्या बाळांपेक्षा वेगळा, सर्व मुलामुलिंत एकटाच छान काळं जावळ असणारा. आणि त्यानंतर तू सगळंच विश्व व्यापलंस..फ़क्त माझंच नाही तर बाबा, आज्जी आणि सगळ्यांचचंआता तुझं अधिक वय आणि प्रत्येक महिन्यांत होणारं काही ना काहीतरी यापाठी तास, महिने, दिवस कसे जात होते ते कळलंच नाही.. वाढदिवसाच्या आतच अडखळत चालणारा तू पाहुन मीच पडायचे खरं तर..पण तरी तुला सावरण्यासाठी नेहमीच होतेआम्ही दोघंही आणि गेल काही महिने आज्जी पण

पण आज तुझं डोळ्यात पाणी आणून मलाच टाटा करणं आणि त्याही अवस्थेत पापा देणं फ़ार अस्वस्थ करुन गेलं रेअसं पहिल्यांदाच झालंय की एकटं घर माझी वाट पाहातेय..नेहमीच अप अपकरत आपण दोघं आलो की पुन्हा असलेल्या पसार्‍यात भर घालायचा तुझा छंद आणि ओरडायचा माझादोन्ही आज खूप शांत आहेत…’लवकर झोप रे’ असं तुला म्हणणारी मी आज जेवणाची वेळ टळून गेली तरी कसला तरी विचार करत तशीच बसलेय

मला अपराधी वाटतंय का?? कदाचित होपण बाळा ज्याठिकाणी आपण राहातोय आणि पुढे ज्या परिस्थितीत तुला जावं लागेल ना, त्यावेळी फ़क्त माझा आश्वासक हात पाठीवर असून फ़ायद्याचा नाही रेआज तू रडतोस (आणि मी जास्त); पण उद्या तू तिथेच रमशील आणि माझं मन मात्र आपल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झोके घेत तसंच हेलकावत राहिल

तुझी आई१९ फ़ेब्रु. २०१०

संबंधित लेखन

 • जागे व्हा…..!!
  माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
 • यथा राजा तथा अधिकारी….

  आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त…

 • माझी माय .. अरुण फिरोदिया..
  बऱ्याच लोकांच्या बद्दल मनामधे एक असा आकस असतो.अर्थात , त्या साठी काहीच कारण असावं लागत नाही. बस्स…
PG

अपर्णा संखे-पालवे

मी अपर्णा संखे-पालवे, शिक्षणाने इंजिनियर, आय.टी. व्यवसायात गेले काही वर्ष अमेरिकेत मुक्काम, त्यामुळे कमी होत चालेला मराठीशी संपर्क..अशा पार्श्वभुमीवर ब्लॉगिंग करायला घेतलं आणि लक्षात आलं की मराठीत विचार मांडता आल्यामुळे होणारा आनंद काही औरच आहे. जे काही थोडे फ़ार कडू-गोड अनुभव येतात त्या क्षणांच्या आठवणी होण्याआधीच आजकाल त्या माझिया मना ब्लॉगवर मांडल्या जातात. मराठीमधले अनेक सुंदर सुंदर ब्लॉग्ज वाचणं आणि जमेल तिथे प्रतिक्रिया देणं हेही सध्या आवडीने करते.

 1. Aparnaatai,
  Khoopach sundar lihalele aahe.

  Agadi Hrudayala bhidun gele ani Aai chi aathvan aali……

  Tumache khoop khoop dhanyavaad.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME