वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

११८ वर्षांची गणेशोत्सव परंपरा………….

२ प्रतिक्रिया

दगडूशेठ च्या शतकातील तीनही मूर्तींचे आजही विधिवत पूजन

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केलेली श्रींची पहिली मूर्ती :-

हि मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी १८९३ साली तत्कालीन मूर्तिकार बाबुराव नाईक यांच्याकडून बनवून घेतली आणि त्यासाठीची बिदागी अवघी बावीस रुपये होती.

रांध्यापासून तसेच गुळाची ढेप व कागदाचा लगदा या पासून हि मूर्ती बनविण्यात आली आहे. या मूर्तीच्या पोटात विधिवत गणेश यंत्र बसविण्यात आले आहे.

आजही हि मूर्ती अकरा मारुती चौक येथील राम मंदिरात आहे व तिची
नित्य नेमाने पूजा केली जाते.

 •  जगभर ख्याती पसरलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्ती गेल्या शतकात दोनदा बदलण्यात आल्या असून विद्यमान मूर्तीप्रमाणेच आधीच्या दोन्ही मूर्तींची  आजही विधिवत पूजा करण्यात येत आहे :

 

श्रीच्या मुर्तीविषयी

 

 अकरा मारुती चौक येथील श्रींची पहिली मूर्ती

सन १८९३ :-

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वत: व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, ”आपण काही काळजी करू नका, आपण श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील”. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपती बाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती होय. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजा चालू आहे. ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पण तेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले. भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोर लोकांनी मनोमन आर्शिवाद दिले आणि अशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.

 बाल संगोपन केंद्र, कोंढवा येथील श्रींची दुसरी मूर्ती

सन १८९६ :-

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती म्हणून प्रचलित होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरूण मंडळ करीत होते. सध्या ही मुर्ती आपल्या बाबुराव गोडसे कोंढवा येथील पिताश्री वृध्दाश्रमातील मंदिरात आहे.

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती श्रींची तिसरी मूर्ती

सन १९६८ :-

सन १८९६ साली केलेल्या मुर्तीची थोडी जीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली आपल्या गणपती बाप्पाच्या अमृत महोत्सव साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या प्रमुख म्हणजेच सर्वश्री प्रताप गोडसे, दिंगबर रासने, रघुनाथ केदारी, शंकर सुर्यवंशी, चंद्रकांत दरोडे, उमाजी केदारी, प्रल्हादशेठ शर्मा, रमाकांत मारणे, वसंत कोद्रे, कांता रासने, दत्तात्रय केदारी, उल्हास शेडगे, उत्तम गावडे इत्यादी. ब-याच कार्यकर्त्यांनी नविन गणपतीची मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिध्द शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मुर्ती नमुना म्हणून करून घेतली व श्री. बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टर वरून मोठया पडद्यावर कार्यकर्त्यांना दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मुर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर प्रत्यक्ष मोठया मुर्तींचे काम सुरू झाले. संपूर्ण मुर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. श्री. गणेश यंत्राची पुजा केली व त्यानंतर ज्याठिकाणी मातीची मुर्ती तयार केली, त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला व ते सिध्द श्रीयंत्र मंगलमुर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. या मंगलमुर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पुजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. आजतागायत हे सर्व अत्यंत निठेने व प्रामाणिकपणे सुरू आहे व त्यामुळे आपणा सर्वांना त्या गणपती बाप्पाचे आर्शिवाद लाभले आहेत. अशा प्रकारे सध्या आपल्या गणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर, नवसाला पावणारी व त्याकाळी सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रूपये) ही मुर्ती बनविण्याचा खर्च आला होता.

More info:-

संबंधित लेखन

PG

Sumeet

 1. ily afford.
  The subsequent grade about stone is definitely the Very Lumination Brown Boulders.These Stones are incredibly undesirable generally if the brown is detected through naked eye ball.Brown hued stones glance dark below artificial lighting.The lighter in the brown stones can almost looked into crystals.Abdominal muscles Light Grey Stones considering the lighter dark brown tint can be pretty and additionally desirable gemstones.The stones considering the lighter dark brown tint are often times more sensible and very easily sold compared to a stones by having a yellow hue.
  Following Very Lgt Brown boulders come a Silver Capes.This division is divided in the Top Metallic Capes additionally, the Silver Capes.These boulders have a great deal of yellow with them, a high quality would quite simply detect the following, but the public ily afford.

  The subsequent grade about stone is definitely the Very Lumination Brown Boulders.These Stones are incredibly undesirable generally if the brown is detected through naked eye ball.Brown hued stones glance dark below artificial lighting.The lighter in the brown stones can almost looked into crystals.Abdominal muscles Light Grey Stones considering the lighter dark brown tint can be pretty and additionally desirable gemstones.The stones considering the lighter dark brown tint are often times more sensible and very easily sold compared to a stones by having a yellow hue.

  Following Very Lgt Brown boulders come a Silver Capes.This division is divided in the Top Metallic Capes additionally, the Silver Capes.These boulders have a great deal of yellow with them, a high quality would quite simply detect the following, but the public would watch these stones as whitened.The Best Silver Capes additionally, the Silver Capes are exactly what is usually sold in that country.They really are affordable and really beautiful to an average joe.

  Following Silver Capes can be bought the Capes.They can be known like commercial stones.They really are off colour even with the naked eye ball.Under phony light they seem whiter pebbles.These diamonds are almost always worn later in the day to seem more fantastic.The Capes is the diamond that a lot people get.They typically are not as extravagant.

  Stones not as good in color as opposed to Capes you should not sell well in that country, and they are often not likely sold hassle-free all.Following Capes take place Yellow boulders.The White stones are certainly not yellow enough to remain pretty.These are undesirable with the eye.The white tint that they can possess is known as a murky grimy look.They cannot possess a fabulous clean or even clear yellow-colored tint.

  A final white stone is addressed as the Dark brown Stone.Your Brown shot lacks hold on their owners and natural beauty.The Dark stone appears to be like dull as well as murky around artificial and additionally in substantial light.Brown boulders are nuisance by Usa shoppers and also any nationality.

  Seeing that the descriptions belonging to the grades associated with white expensive diamonds is carried out, it have to be obvious to jeweler blend various marks in their stock or simply display.Shoppers who have no idea of the various grades and also understand them can be dissatisfied utilizing prices or stones make see.To many customers earn and perfection is the same in every one cases by using diamonds.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME