वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

‍र्‍हस्व – दीर्घ

१८ प्रतिक्रिया

या लेखात र्‍हस्व-दीर्घ संबंधित व्याकरणातील बहुतेक नियम सांगितले आहेत.

र्‍हस्व – दीर्घ (अन्त्य अक्षरे)

१) एकाक्षरी शब्दातील इ-कार किंवा उ-कार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो दीर्घ लिहावा:
उदा.
मी, ही, ती, जी, तू, जू, पू, इत्यादी.

२) मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इ-कार किंवा उ-कार उच्चारानुसार दीर्घ लिहावा:
उदा.
आई, ताई, पट्टी, ताटली, वही, पेटी, वाळू, बंडू, बाळू, चेंडू, दारू इत्यादी.

३) कवि, हरि, मधु, गुरु, वायु, प्रीति यांसारखे तत्सम (र्‍हस्व) इ-कारान्त व उ-कारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घान्त उच्चारले जातात म्हणून तेही दीर्घान्त लिहावेत:
उदा.
बा.भ. बोरकर हे कवी आहेत.
हरी आणि मधू हे माझे मित्र आहेत.
द्रोणाचार्य हे पांडवांचे गुरू होते.
मी तुझ्या प्रीतीत हरवलोय गं..

४) व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे शब्द (संस्कृतातून मराठीत जसेच्या तसे आलेले) जरी मुळात र्‍हस्वान्त असले तरी मराठीमध्ये ते दीर्घान्त लिहावेत:
उदा.
हरी, अन्योक्ती, अतिथी, विभक्ती, संधी, कुलगुरू, इत्यादी.

५) पण जर सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (र्‍हस्व) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम (काही) शब्द असेल तर ते र्‍हस्वान्तच लिहावेत:
उदा.
कविराज, लघुकथा, वायुपुत्र, मृत्युलेख, गुरुदक्षिणा, भक्तिपर, हरिकृपा, शत्रुपक्ष, पशु-पक्षी, रविवार, भानुविलास, गतिमान इत्यादी.

६) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (दीर्घ) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असेल तर ते दीर्घान्तच लिहावे:
उदा.
लक्ष्मीपुत्र, महीपाल, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन, वधूवर, श्रीधर, नदीतीर, भगिनीमंडळ इत्यादी.

७) विद्यार्थि‍न्, प्राणिन्, पक्षिन्, यांसारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतांना त्यांच्या शेवटच्या ‘न्’ चा लोप होतो व उपान्त्य र्‍हस्व अक्षर दीर्घ होते.
उदा.
विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री, गुणी, धनी, योगी, स्वामी

८) पण जर हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर ते र्‍हस्वान्तच ठेवावे:
उदा
. विद्यार्थिगृह, प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रिमंडळ, स्वामिभक्त, योगिराज इत्यादी.

९) पुढील तत्सम अव्यये व ‘नि’, ‘आणि’ ही दोन मराठी अव्यये र्‍हस्वान्तच लिहावीत:
उदा.
परंतु, अद्यापि, तथापि, अति, इति, प्रभृति, यद्यपि, यथामति, नि, आणि इ.
(सुचना. ‘इत्यादी’ हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घान्त लिहावा.)

र्‍हस्व – दीर्घ (उपान्त्य अक्षरे)

१) मराठी शब्दांतील अ-कारान्तापूर्वीचे इ-कार व उ-कार दीर्घ असतात:
उदा.
खीर, पीठ, फूल, सून, गरीब, कठीण, नाईक, हुरूप, विहीर, दीर, नीट, मूल, ऊस, बहीण, जमीन, ठाऊक, वसूल इत्यादी.

२) पण तत्सम शब्दांतील अ-कारान्तापूर्वीचे इ-कार व उ-कार मूळ संस्कृतात असल्याप्रमाणे र्‍हस्वच राहतात:
उदा.
गुण, युग, विष, प्रिय, मधुर, मंदिर, अनिल, परिचित, स्थानिक, बुध, सुख, हिम, शिव, कुसुम, तरुण, रसिक, नागरिक, सामाजिक इत्यादी.

३) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार किंवा उ-कार असतो:
उदा.
किडा, गुणी, पिसू, मेहुणा, सरिता, वकिल, पाहिजे, मिळवितो, दिवा, सुरी, सुरू, तालुका, गरिबी, महिना, ठेविले, फसविले इत्यादी.

४) पण तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतात असल्याप्रमाणेच दीर्घ ठेवावी. वरील नियम क्र. ३) प्रमाणे ती र्‍हस्व ठेवू नयेत:
उदा.
पूजा, भीती, प्रीती, पूर्व, दीप, पीडा, नवीन, संगीत, लीला, नीती, कीर्ती, चूर्ण, नीच, क्रीडा, शरीर, परिक्षा इत्यादी.

संदर्भः “सुगम मराठी व्याकरण लेखन”
लेखक: कै. मो.रा. वाळंबे
नितीन प्रकाशन, पुणे – ३०

संबंधित लेखन

 • मराठी भाषा – शुद्धलेखन
  शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. वि + आ + (कृ(->करण)) = व्याक…
 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • कलेचं देणं
  कलेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे म्हणा. तसे पा…
 • उबुन्टू १०.०४ मध्ये iBus द्वारे देवनागरीत टंकलेखन
  बर्‍याच जणांनी काही दिवसांपूर्वी  प्रकाशित केलेल्या “उबुन्टू १०.०४” लेखाला भरभरून प्रतिसाद दिला व…
 • (नव)रस
  ‘रस’ याचा शब्दशः अर्थ ‘चव’ किंवा ‘रूची’ असा आहे. व्यावहारिक जीवनात एकूण ज्ञात सहा रस आहेत: गोड, क…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. विशाल महोदय, जवळ जवळ १९६४ नंतर आज मी शुद्ध लेखनाचे नियम काळजीपूर्वक वाचले. इतक्या वर्षानंतर माझ्या स्मृती जरा चाळवल्या.थोडावेळ भूतकाळात प्रवास करून आलो. धन्यवाद या माहितीबद्दल.आपल्याला तंत्रज्ञानावरील http://savadhan.wordpress.com/2010/02/28/कडाडणाऱ्या-वीजॆ-पासून- हा लेख आवडेल अशी अपेक्षा आहे.आपला बहूमूल्य अभिप्राय अवश्य द्यावा ही विनंती.

 2. विशाल महोदय, संगणक या विषयातील तज्ञ नाही.”काम कामाचा गुरू” या न्यायने येणार्‍या अडचणी सोडवत जायचे.अशा भूमिकेतून एका सेवानिवृत्ताने लिहिलेले हे लेख आपल्यला आवडतात हेच मुळि मला एखाद्या टॉनिकसार्खे आहे.आपले कवतुकाचे दोन शब्द सुद्धा आम्हा वयोवृद्धाना आनंदाने जीवन जगण्यास पुरेसे ठरत्तात.
  असाच सामाजिक विषयावर्चा एक लेख “मोफत प्रशीक्षण—-आढावा !” लिहिला आहे. तो सवडीने वाचावा अशी नम्र विनंती आहे.या लेखात संचमांडणीचे मेगरींग कसे करावे ते कवितेतून मांडले आहे.

  • पुरूषोत्तम काका,

   आपले इथे प्रकट केलेले विचार अतिशय अभ्यासपूर्ण असतात. आपल्या जालनिशीवर आपण लिहिलेले पोस्ट्स मी सवड मिळेल तसे वाचतच आहे, सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्या प्रत्येक लेखाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही त्या लेखातील विषयाला अनुसरूण ज्या कविता करता ना, त्या अगदी मजेदार व छान असतात. तुमच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहेच, तुम्ही ब्लॉगवर लेखन करणे मात्र अजिबात सोडू नका, एखादेवेळी प्रतिक्रिया देण्यास मी विसरलोही आहे, त्याबद्दल क्षमस्व!

   आपले नेहमी आशिर्वाद असू द्या.

   प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

 3. य.ना.वालावलकर म्हणतात:

  श्री.विशाल यांचा शुद्धलेखनावरच लेख महितीपूर्ण आहे.(शेवटी अनवधानाने परीक्षा शब्दातील मधले अक्षर ह्रस्व पडले ते असो.)
  लेखन व्याकरणशुद्ध असावे हे खरे.पण शुद्धलेखनाला अवास्तव महत्त्व नसावे.प्राधान्य असावे ते लेखनातील आशयाला. तो चांगला हवा. मांडणी व्यवस्थित बिंदुगामी(मुद्देसूद) हवी.व्याकरणाच्या काही चुका झाल्या तर क्षम्य मानाव्या.
  इथे जी मराठी शुभेच्छापत्रे दिली आहेत,त्यांवरील चित्रे छान आहेत.अशी सुविधा निर्माण करणे हे काम प्रशंसनीय आहे.पण “नवीन वर्ष” असे हवे होते तिथे दुर्दैवाने”नविन वर्ष ” असे अशुद्ध पडले. शक्य झाल्यास सुधारण करावी. तसेच नूतन वर्ष,नव वर्ष,प्रस्तुत वर्ष असे पर्याय वापरणेही शक्य आहे.

 4. सुभाष गोरे म्हणतात:

  मला लेख वाचायला आवदला पन हे देव् नागरिमधे किबोर्द् वर लिहिने फर अवघद जत आह्ए.
  कुनि मला मदत करेल का?

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME