वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आमची कार्यपद्धती

नमस्कार मराठी मंडळी!!!

या संकेतस्थळावर आपले स्वागत. या संकेतस्थळावरील लेख वाचून आपली देखील या संकेतस्थळासाठी योगदान देण्याची इच्छा नाही झाली तरच नवल! आणि आम्हीही आपले स्वागतच करु, परंतु लेखनाची गुणवत्ता राखण्याच्या आणि अवांतर किंवा प्रक्षोभक लेखन टाळण्याच्या उद्देशाने या संकेतस्थळाच्या कार्यपद्धतीमध्ये इतरांच्या मानाने थोडा फरक आहे. आम्ही एक संपादक मंडळ तयार केले आहे. ज्यामध्ये आपल्यातीलच काही मंडळी सदस्य आहेत. सर्व लेखांचे आणि प्रतिक्रियांचे नियंत्रण सर्वस्वी संपादक मंडळाच्या हाती आहे. कालपरत्वे त्यावरील सदस्य बदलले जाऊ शकतात.

सरसकट सर्व सदस्यांना इथे लिहिण्याची अनुमती दिली गेलेली नाही. तर निमंत्रित लेखकच फक्त इथे लेखन करु शकतील. लेखक सदस्यांची निवड संपादक मंडळ ठरवेल. त्यासाठी आपल्या सद्यस्थितीतील ब्लॉगवरील लेखनाची गुणवत्ता आणि विषयांचे वैविध्य हा एकमेव निकष असेल. आपणांस योगदान द्यावयाचे असल्यास आपण आम्हांस आपल्या ब्लॉगच्या लिंक्ससह आमच्याशी aamhi[AT]marathimandali[DOT]com या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा. संपादक मंडळ चर्चा करुन आपल्याला लेखनानुमती देण्याविषयी निर्णय घेईल. आपणांस अनुमती देण्यासंबंधी एक मेल येईल ज्यामध्ये आपणांस आपले सदस्यनाम आणि परवलीचा शब्द असेल. ते संदर्भ वाचून आपण संकेतस्थळावर लेखन करावे. आपण ते लेखन जतन करताच ते लेखन संपादक मंडळाच्या मान्यतेसाठी सादर होईल. संपादक मंडळ ते लेखन शुद्धलेखन आणि गुणवत्तेच्या कसोटीवर पडताळून ते मान्य करतील. आणि मग आपले लेखन संकेतस्थळावर दृश्यमान होईल. त्याच त्याच विषयांवरील सतत लेखन टाळण्यासाठी लेखकांच्या ठराविक गटाला ठराविक कालावधीसाठी लेखनाची संधी दिली जाईल. संपादक मंडळावरील सदस्यांसाठीही हाच नियम असेल.

त्याव्यतिरिक्त ब्लॉगिंग आणि तत्संबंधी आपल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी आम्ही एक चर्चासत्र (फोरम) तयार केलेले आहे. या चर्चेसत्रावर लिहिण्यासाठी मात्र कुठलीही अनुमती आवश्यक नाही. आपण मुक्तपणे तिथे लेखन, प्रश्न, शंका आणि त्याचे निरसन करु शकता. फोरमचा हेतू हच आहे की, ब्लॉगिंगसंदर्भात सर्व प्रश्नांचे एका ठिकाणी सर्वांना समजेल अशा भाषेत उत्तर मिळावे. चर्चासत्रावर जाण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक कराः
दुवाः मराठी मंडळी चर्चासत्र

याशिवाय तुम्ही आपापले ब्लॉग/संस्थळे, मराठी मंडळीला जोडू शकता, जेणेकरून तुमच्या ब्लॉग/संस्थळावरील नविनतम लेखन “मराठी मंडळी ब्लॉगर्स” या पृष्ठावर कोणीही पाहू शकेल, व तुमच्या संस्थळाला मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यास मदत होईल!

आम्हांस खात्री आहे आपण सहकार्य कराल आणि या संकेतस्थळास ऑनलाईन मराठी जगतात एक वेगळी उंची गाठून द्याल.

PG

पंकज झरेकर

"रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!" म्हणजेच... आगळीच दुनिया आहे माझी...माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय...त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या....... कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती...माज आणि मस्ती जिरवायला...

Powered By Indic IME