वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

’आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु’

८ प्रतिक्रिया

अद्ययावत सुविधांनी नटलेल्या व मराठी ब्लॉगविश्वात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असणार्‍या ’मराठी मंडळी’ या संकेतस्थळाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या डौलात पार पडला.

मराठी मंडळी

आंतरजालावर मराठीतून लिखाण करणार्‍या सर्वांचे हक्काचे व्यासपीठ, तमाम मराठी ब्लॉगर्सचे माहेरघर ठरू शकेल असे अनेक गुणवैविध्याने नटलेले हे उपयुक्त संकेतस्थळ आजपासून सर्वांच्या सेवेसाठी रूजू झाले.

आज दि. १ मार्च २०१० रोजी, रात्री १० वाजून ३ मिनीटांनी सर्व प्रस्थापित रिवाजांना फाटा देऊन, मराठीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार्‍या या साईटचे आंतरजालावर दिमाखात प्रकाशन करण्यात आले. प्रत्यक्ष सोहळ्याला शंभराहून अधिक वाचकांनी व मराठी ब्लॉगर्सनी जगाच्या विविध भागातून ऑनलाईन उपस्थित लावली होती. एका अनोख्या व ऐतिहासिक अश्या या उद्घाटनाचा मान हा या कार्यक्रमासाठी हजर असलेल्या आणि ज्यांच्या हार्दिक शुभेच्छा या लेखनयज्ञासाठी सदैव मागे आहेत अश्या समस्त मराठी लेखक-वाचक बंधु आणि भगिनींना देण्यात आला.

तंत्रज्ञानाच्या करामतीने आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला हा प्रकाशनाचा कार्यक्रम त्यातील नीटनेटकेपणा, सुसुत्रबद्धता व पाहुण्यांच्या उत्साहाने अविस्मरणीय ठरला. उद्घाटनासाठी निर्माण करण्यात आलेल्या चॅट रूम (गप्पाष्टक)चा सढळ हाताने वापर करून घेऊन संयोजक व प्रेक्षकांमध्ये विचारांची मौलिक देवाणघेवाणही झाली.

नव्याने प्रकाशित झालेल्या संकेतस्थळावर वाचकांच्या व विचक्षण अभ्यासकांच्या उड्या पडल्या. बहुतेकांनी संकेतस्थळाचे स्वरूप, उद्देश, कार्यप्रणाली आणि वैशिष्ठ्ये यांबद्दल समाधान व्यक्त केले आणि या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मराठी मंडळीचे संस्थापक-व्यवस्थापक सर्वश्री. दीपक शिंदे, पंकज झरेकर, विक्रांत देशमुख व अनिकेत समुद्र यांचे अभिनंदन केले. वाचकांच्या व ब्लॉगलेखकांच्या पसंतीस उतरलेल्या या संकेतस्थळावर आज जमलेल्या काही पाहुण्यांनी आपल्या लेखनसेवेचा श्रीगणेशा केला.

मराठी मंडळी - चर्चासत्र

मराठी मंडळी – चर्चासत्र

मराठी ब्लॉगर्सना संघटीत करून, त्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या अनेकविध समस्यांची उत्तरे शोधण्याच्या या अत्यंत प्रशंसनीय व उपयुक्त उपक्रमाचे मराठी ब्लॉगविश्वाने भरभरून स्वागत केले आहे. मराठी नेटजगताने दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल व कौतुकाच्या थापेबद्दल मराठी मंडळीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी मनःपुर्वक आभार मानले आहेत.

हे संकेतस्थळ व त्यावरील विविध सुविधा www.marathimandali.com

या पत्त्यावर आजपासून खुले करण्यात आले आहे. ह्या संकेतस्थळाची मोबाईल आवृत्तीही या निमित्ताने जीपीआरएस सेवेमधल्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मराठी मंडळी - ब्लॉगर्स संघ

मराठी मंडळी – ब्लॉगर्स संघ

तत्पुर्वी आज सायंकाळी पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचाच एक भाग म्हणून “भूर्जपत्र ते वेबपेज: मराठी भाषेचा विकास” असा एक परिसंवाद झाला. त्यात ’मराठीमंडळीचे’ प्रतिनिधी श्री विक्रांत देशमुख यांनी मराठी ब्लॉगर्सची बाजू मांडली आणि मराठीमंडळी.कॉमचे वेगळेपण प्रतिपादित केले.

चर्चासत्राचे सूत्रसंचालक व ’माध्यमाईटस’ या प्रसारमाध्यमातील समूहगटाचे एक सदस्य वाहीनीचे श्री. प्रसन्न जोशी यांच्या विनंतीवरुन प्रख्यात साहित्यिक आणि विचारवंत अनिल अवचट यांनी प्रकाशनपूर्व प्रकाशनाची घोषणा करुन या संकेतस्थळासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व नेटिझन्सना या इ-सोहळ्यासाठी ’इ-पस्थित’ राहण्यासाठी आवाहन केले.

संबंधित लेखन

PG

विक्रांत देशमुख

मी एक चिमुकलं रानफुल…रंग,रूप,गंध नसलेलं… दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं… त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला… रुतुराज आज वनी आला’.

  1. विक्रांत, अनिकेत, दिपक, विशाल आणि पंकज तुमचे खुप खुप कौतुक आणि अभिनंदन. मराठीमंडळी.कॉम एकदम सॉलिड बनली आहे.

    साईट प्रसिद्ध झाली त्यादिवशी खुप प्रयत्न केला पण कमेंट देता आली नाही (Some technical error) आणि नंतर काही कामानिमीत्त राहुन गेलं. असो.

    मराठी मंडळी.कॉम मराठी ब्लॉगींगची पताका अखिल आर्यावर्तात मिरवत राहील यात शंकाच नाही. पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.

  2. निलेश रसाळ म्हणतात:

    अतिशय स्तुत्यउपक्रम आहे मित्रानो….
    हार्दिक अभिनदन व मनपुर्वक शुभेच्चा

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME