वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया
शोध
फोटोग्राफर्स@पुणे मेळावा
नमस्कार मंडळी,
आपणांस फोटोग्राफीची आवड असेल आणि पुण्यातील काही हौशी फोटोग्राफर्सना भेटण्याची इच्छा असेल तर आपणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. फोटोग्राफर@पुणे’तर्फे येत्या रविवारी म्हणजे १८ एप्रिल २०१० रोजी, सकाळी ७:३० वा. पुण्यात अशाच काही हौशी फोटोग्राफर्सचा मेळावा आयोजित केला आहे. विविध फोटोग्राफर्सना भेटणे, ओळखी करुन घेणे, अनौपचारिक गप्पा मारणे, त्यांचे अनुभव ऐकणे, फोटोग्राफीचे शक्य ते ज्ञान मिळवणे, फोटोग्राफीच्या नवनवीन साधनांची ओळख करुन घेणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे.
फोटोग्राफर्स@पुणे हा ग्रुप (ज्याला P@P असेही संबोधले जाते) २००६ मध्ये काही बोटांवर मोजण्याइतक्या मित्रांनी स्थापन केलेला एक ऑनलाइन ग्रुप आहे. एका परदेशी शहरातल्या ग्रुपपासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेला हा ग्रुप सुरुवातीला फार थोड्या लोकांना माहिती होता. वारंवार निमंत्रणे पाठवून काही सदस्य जमा झाले होते. सगळ्यांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे आपले छायाचित्रण कौशल्य सुधारणे. त्यासाठी मोजके लोक एकत्र भेटून स्वत:चे विचार एकमेकांशी शेअर करत असत. हळूहळू या ग्रुपने मूळ धरले आणि आज तीन वर्षांमध्ये या ग्रुपचे आज जवळपास १५०० हून अधिक सदस्य झाले आहेत. पूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. त्यामध्ये कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज लोक, विविध वयोगटातील हौशी छायाचित्रकार आहेत. काही सदस्य जरी पुणे शहराबाहेर असले तरी ते सदस्य काही ना काही कारणाने या शहराशी आपले नाते जपून आहेत मग ते भले नोकरीनिमित्त इतर शहरांमध्ये किंवा देशांमध्ये स्थायिक झाले असतील किंवा आज बाहेरुन येऊन पुण्यात स्थायिक झाले असतील.
सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन परस्पर संवाद साधणे आणि कौशल्याची देवाण-घेवाण करणे हा प्रमुख हेतू बाळगून या ग्रुपने वाटचाल सुरु केली आहे. प्रत्येक सदस्य फोटोग्राफीच्या अनेक पैलूबद्दल एकमेकांना मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेटी-गाठी आणि ऑनलाइन चर्चेच्या माध्यमातून फोटोग्राफीसंदर्भात अनेक विषय चर्चिले जातात. त्याद्वारे अनेक नविन फोटोग्राफर्सना शिकण्याची संधी मिळते. अणि विशेष म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ग्रुपचा सदस्य होण्यासाठी फ्लिकर अकाउंट असणे ही एकमेव गरज आहे. कुणीही या साइटवर रजिस्टर करुन फोटोग्राफर@पुणेचा सदस्य होऊ शकतो.
प्रत्येक फोटोग्राफरचे वेगळे कौशल्य असते आणि ते इतरांबरोबर शेअर केल्याने अनेकांना त्याचा फायदा होतो, तसेच त्यालाही आपले गुण-दोष समजतात. फोटोग्राफीच्या संदर्भातील अनेक पैलूंवर जाणकार लोकांकडून सदस्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी ग्रुपचे सदस्य नियमितपणे एकमेकांना भेटून संवाद साधतात. ग्रुपमार्फत अनेक चर्चासत्रे, सहली, कार्यशाळा, बैठका, जेष्ठ छायाचित्रकारांची व्याख्याने आयोजित केल्या जातात. गेल्यावर्षी पु.ल. देशपांडे उद्यान, सारसबाग, वाई-मेणवली, तिकोणा किल्ला, काही इनडोअर शूट आयोजित केले गेले. त्याचबरोबर सदस्य एकत्रितपणे किंवा लहान लहान गटांमध्ये मुळशी-ताम्हिणी, जेजुरी, रायगड, पानशेत, सिंहगड, भिगवण, मयुरेश्वर अभयारण्य, दिवेघाट परिसर अशा ठिकाणी फोटोग्राफीकरता जात असतात. ग्रुपच्या अनेक सदस्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीव स्तरावर पारितोषिके मिळाली आहेत किंवा त्यांच्या फोटोंचे हक्क विकले गेले आहेत.
फोटोग्राफर@पुणे’विषयी अधिक माहिती आणि फोटो, चर्चासत्रे आपणांस खालील दुव्यावर वाचता येतील.
http://www.flickr.com/groups/photographersatpune/
फोटोग्राफीमध्ये स्वतःच्या आनंदामध्येही ग्रुपच्या सदस्यांना समाजाचा कधीच विसर पडला नाही. एक सामाजिक बांधिलकी बाळगून प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रुपने विविध सामजिक संस्थांना नेहमीच मदत केली आहे. आपल्या आनंदामध्ये दुर्लक्षित घटकांना सहभागी करुन घेण्याचा ग्रुपचा प्रयत्न नेहमीच स्तुत्य राहिला आहे. आतापर्यंत फोटोग्राफर्स॒पुणेने तीन यशस्वी प्रदर्शने आयोजित केली आहेत. पहिले प्रदर्शन जुलै-२००८ मध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये भरले होते. त्याद्वारे जमा झालेला निधी विद्या महामंडळाच्या मूक-बधिर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्यात आलेला होत. दुसरे प्रदर्शन त्याच वर्षी डिसेंबरमध्ये न्यू आर्ट गॅलरी घोले रोड येथे भरवून जमा झालेला निधी ’आपले घर’ या सामाजिक संस्थेला देण्यात आला. गेल्या वर्षी पुन्हा एकदा तिसर्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि मूक-बधिर मुलांसाठी काम करणार्या संस्थेला निधी उभा करुन देण्यात आला.
अशा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला हे निमंत्रण.
काय: फोटोग्राफर्स@पुणे मेळावा
कधी: रविवार, १८ एप्रिल २०१०.
वेळ: सकाळी ७:३० वाजता.
कुठे: पु.ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे.
कुणासाठी: फोटोग्राफीची आवड असणार्या सर्वांसाठी.
संपर्क क्रमांक: ९९२१८४५१५१ (पंकज), ९८५००३६२७५ (सुहास).
या विषयाला अनुसरुन असलेले आणखी काही लेखनः
- बोलु कौतुके !!! सदरचा माहितीपर लेखही हा एका वृत्तपत्रासाठी लिहिला आहे, तो प्रकाशित झाल्यावर इथे कळवले जाईलच. मात्र त्याआगोदर आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मी माझ्या मराठी मंडळीवरील...
















१८ मार्च २०१० कि १८ एप्रिल २०१० ……..?
मी नक्की येईन ………
१८ एप्रिल म्हणायचे आहे का.. ??
pankaj,
कधी: रविवार, १८ मार्च २०१०.
is it 18th April?
माफ करा मंडळी. कृपया १८ एप्रिल असे वाचावे. तसदीबद्दल क्षमस्व.
माझ्या जवल चान्गला क्यमेरा नाहि.म्हनुन येउ शकत नाहि
गोरे साहेब, चांगला कॅमेरा म्हणजे काय? कुठल्याही कॅमेराने आपली आवड जोपासता येते. हौस असली की पाऊस आपोआप पडतो. आपण या, आपले स्वागत होईल. साध्या कॅमेराने पण सुंदर फोटो काढायचे तंत्र माहित करुन घ्या तिथे.
I will certainly join….
khoop changala upakram aahe .aapanas shubheccha .Mi ek haushi photographer aahe pan Basmathnagar Pune anter 500km asalyamule echha asunahi sahabhagi hota yet nahi .kshamasva .
its good opportunity, i would love to join
फोटोग्राफर्स@पुणे मेळावा zala aasel ter please koni tari eakde update karave
kya zale tya madye te..
aase pan barech jan aahet jya ne he post ushera vach li aahe tari please kya zale te update karave ..
My blog about the dailly activities happening in around the word. this is my persoanl thinking about this world.Blog have some good picture, snap’s,photography’s. blog about my thinking my atitute to look this buetyfull world.Here some great peopole who change the history, so I can try to mantain my level up.
Hi Pankaj
Tumhi khup changali mahiti dili aahe camerya baddalchi
tyabaddal man:purvak dhanyavad
malahi photographyvishayi far aawad aahe
ajun mahiti vachayala nakki aawadel
regards
Ashwini Pandire
Hi Pankaj,
Upakram farch chan ahe…photography baddal ajun mahiti karun ghyayla nakkich awdel. फोटोग्राफर्स@पुणे मेळावा che updates milale tar changla hoil..As maza sarkhi ajun khup loka astil jyanni ha post nantar baghitlay…
Pooja Datar
नमस्कार पंकज,
फोटोग्राफर्स@पुणे मेळावा पुन्हा एकदा आयोजित करावा अशी खूप इच्छा आहे.
मला फोटोग्राफीची अतिशय आवड आहे.. फोटोग्राफी बद्दल अजून माहिती करून घ्यायला नक्कीच आवडेल.
फोटोग्राफर्स@पुणे मेळावा चे updates मिळाले तर चांगलं होईल…
~ गौरी
गौरी, सगळे अपडेट्स फोटोग्राफर्स@पुणे’च्या फ्लिकर ग्रुप पेजवर उपलब्ध होतील.