वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

दृष्टिकोन २०१०

१९ प्रतिक्रिया

अज्ञातच पायवाट
कुणी चेहरा निनावी
उडी उंच किटकाची
कैसी कुणी पहावी ?
चिमुकले असे हे विश्व
देखणेच संध्यारंग
ना पुन्हा पुन्हा येतील
क्षण गहिरे घेऊन रंग
रंगात चिंब जणु कविता
कल्पनेमधील प्रवास
अशी भाषा सुंदरतेची
परतून याल पाहण्यास
क्षणचित्रांची ही रूपे
जणु अबोल काही उखाणे
बोलतील ’तुमच्या’ संगे
शब्दांचे लाख तराणे
अवती भवतीची कविता
चित्रबद्ध अवधी केली
द्या ’खुली दाद’ रसिकांनो
ही तुम्हास अर्पण केली
शब्दः प्रिया हळबे

Drushtikon_invite

ग्राफिक डिझाईन संकल्पना: मंगेश भायडे (अक्षर.कॉम)
गेल्या सलग तीन वर्षांच्या उदंड प्रतिसादानंतर ‘दृष्टिकोन २०१०’ हे प्रदर्शन पुन्हा एकदा या वर्षी नव्या छायाचित्रांसह पुणेकरांच्या भेटीस येत आहे. फोटोग्राफर्स@पुणे यांनी आयोजित केलेले हे प्रदर्शन ३ ते ५ डिसेंबर दरम्यान न्यू आर्ट गॅलरी, घोले रोड पुणे इथे भरवण्यात येणार आहे.

फोटोग्राफर्स@पुणे किंवा P@P या नावाने ओळखला जाणारा हा ग्रुप दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करतो. छायाचित्रणाबद्दल हौशी छायाचित्रकारांमध्ये आवड निर्माण करणे याबरोबरच तत्संबंधी परिसंवाद आणि चर्चांचे आयोजन, नवोदितांना अनुभवी छायाचित्रकारांकडून मार्गदर्शन, आपल्या कॅमेरामधून जगाकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याचा मूळ हेतू असला तरी ग्रुपच्या सदस्यांना समाजाबद्दल आपुलकी आहे, जबाबदारीची जाणीव आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘फोटोग्राफर्स@पुणे’ने सामाजिक बांधिलकीचे भान राखून विद्या महामंडळाच्या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निधी उभा करण्याचा संकल्प केला आहे. प्रदर्शनात सहभागी होणार्‍या प्रत्येक सदस्याने आपला खारीचा वाटा तर उचलला आहेच, पण प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतला काही निधीही विद्या महामंडळाकडे सुपूर्त केला जाणार आहे.प्रदर्शनात निवडली गेलेली छायाचित्रे छायाचित्रण क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांनी अनेक निकष लावून निवडली आहेत. या छायाचित्रांचं वैशिष्ट्य असे की ती कधी तुम्हांला बोलती करतात तर कधी हसवतात. कधी डोळ्यांतून आसवांचे मोती वसूल करतात तर कधी हळुवार फुंकरीचे दानही टाकतात. अशा अनेकविध पैलूंनी नटलेल्या या प्रदर्शनात निसर्गचित्रे, वन्यजीवदर्शन, दुर्गदर्शन, प्रवासचित्रे, व्यक्तिचित्रे, अमूर्त छायाचित्रण अशी अनेक प्रकारची इंद्रधनुषी छायाचित्रे पाहायला मिळतील.

२००६ साली फ्लिकर.कॉम या इंटरनेटवरील वेबसाईटच्या माध्यमातून एकत्र आलेले सदस्य फोटोग्राफर्स@पुणे या छत्रीखाली एक झाले. छायाचित्रण आणि आमचे पुणे या दोन गोष्टींशी नाळ जोडून असलेले एकापेक्षा एक सरस असे २००० छायाचित्रकार या ग्रुपचे सदस्य आहेत. छायाचित्रणाचा छंद जोपासणारे असे शालेय विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, उद्योजक, कॉर्पोरेट पदाधिकारी असे समाजातील विविध प्रवर्गातील हौशी छायाचित्रकारांनी या ग्रुपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. नियमित कालावधीनंतर पूर्वनियोजित ठिकाणी एकत्र भेटणे, संवाद साधणे, आपल्या कलेतील त्रुटी-उणिवा जाणून घेऊन त्या सुधारणे, नविन तंत्र समजावूण घेणे, वरिष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन मिळवणे असे काही या ग्रुपचे नियमित उद्योग सुरु असतात. ऑनलाईन चर्चांबरोबरच ग्रुपच्या सदस्यांमध्ये आपसांत समन्वय राखून नियमित फोटोग्राफी सहली आणि मार्गदर्शनपर सत्रे आयोजिली जातात. आणि तेही अगदी विनामूल्य. यासाठी ग्रुपच्या सदस्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. अशा या सतत नवनवीन कार्यकल्पानांमुळे ग्रुपमध्ये कायम उत्साहाचे वातावरण असते, प्रत्येक सदस्यांत एक सळसळता उत्साह असतो. त्या उत्साहाच्या ऊर्जेला समाजविधायक रुप देण्याचाच हा ‘फोटोग्राफर्स@पुणे’चा प्रामाणिक प्रयत्न… ‘दृष्टिकोन २०१०’.

यंदाच्या प्रदर्शनासाठी ‘फोटोग्राफर्स@पुणे’ला इंकफ्लोट प्रिंट्स, ग्रुपग्यान.कॉम, रेडिओ मिरची अशा काही आस्थापनांचे सहकार्य लाभले आहे.

संपर्क: ९९२१८४५१५१, ९८९०४९२८१९, ९८५००३६२७५

संबंधित लेखन

 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • पुण्याजवळील दुर्गदर्शन
  गेल्या पावसाळ्यातल्या वीकएंडला जास्त वेळच नव्हता. अर्धा दिवस मोकळा सापडला. मग काय… शांत थोडाच ब…
 • मला भारतरत्न पाहिजे !

  बस…ठरलं ! आता अजून काही नाही…हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच…काय म्हणता ? मला कशाला…? छे…

PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…

 1. चैताली कदम म्हणतात:

  माफ करा मी या द्वारे तुम्हाला लिहित आहे पण मला पण लिहवस खुप वटतं पण ते कस करु माहित नाहि मी सद्स्य तर आधिपासुन आहे पण या बाबत मदत करावि अशि विनंति

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME