वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

“Lazarus” – संकटवेळी साथ देणारे फायरफॉक्स एक्स्टेन्शन

६ प्रतिक्रिया

जर तुम्ही मोझिला फायरफॉक्स वापरत असाल तर ही खुप महत्वाची गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो. नेटवर असताना आपण कित्येक वेळा अनेक ठिकाणी कॉमेन्ट, पोस्ट, नोंदणी फॉर्म इत्यादींच्या स्वरूपात काहीना-काही लिहीत असतो. कोणाला असे वाटेल की आपण जे एवढे काही इथे लिहीतोय (माहिती भरतोय), ती डिलीट होऊन (किंवा ऊडून) जावी ! कोणालाच वाटणार नाही…!!! पण असं नेहमी होतं…. आपल्याला नको असलं तरी आपल्यासोबत दैनंदिन असे प्रसंग घडतातच…..!!! लाइट गेली म्हणा, बॅटरी संपण, सर्वर टाइम्ड आऊट, सर्वर नॉट फाउन्ड, मोझिला क्रॅश, किंवा अन्य अजुन काही कारणे असतील, जर असं आपल्या बाबतीत घडलं, आणि तेही जर काही इम्पॉर्टंट डेटा भरताना… तर मग ? हं, मान्य आहे काही ठिकाणी जसे की ब्लॉगर वर ब्लॉग एडिटर मध्ये ड्राफ्टच्या रूपात बॅक-अप असतो… हा तर एक अपवाद आहे. पण जर ब्लॉग टेम्प्लेटच्या एच.टी.एम.एल. एडिटर मध्ये काही चेन्जेस करायचे झाले, तर परत-परत टेम्प्लेट कॉपी डाऊनलोड करणं जरा अवघड आणि कंटाळवाणं असतं… आणि आपल्याला आत्ताच केलेले बदल पुर्ववत स्थितीत आणायचे झाल्यास पुढील प्रोसेसेस अजुनच वेळ-खाऊ आणि कठिण होत जातात.

पण, जर तुम्हाला कोणी सांगितले, की तुम्ही जिथे असाल, आणि जे हवं असेल त्याचा लिखाणाचं बॅक-अप एका क्लिकसह परत मिळवू शकता…! तुम्ही विश्वास ठेवाल काय…? कदाचित प्रथमदर्शनी नाही ठेवणार तुम्ही विश्वास…! अहो, पण हे सत्य आहे…. तुम्ही असे एका टिचकीसरशी करू शकता. आणि ते पण कुठेही न जाता… तिथल्या तिथे… लगेच… ऑन दि स्पॉट…!!!

आता तुम्ही विचार करत असणार ते नेमकं कसं शक्य आहे…? म्हणूनच तर सुरूवातीला मी तुम्ही जर मोझिला फायरफॉक्स वापरत असाल, तर खास तुमच्यासाठीच आहे… म्हणून नमूद केलयं…. तर यासाठी तुमच्याकडे मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर असणे गरजेचे आहे. तर त्यात तुम्हाला माहित असेलच नविन ऍड-ऑन कसे प्रस्थापित करायचे असते ते ? बरं जाऊ द्या, सर्वांनी, खास करून नवख्या मंडळींनी खालील कृती व्यवस्थित करा:

Lazarus - Instant Form Recovery

Lazarus – Instant Form Recovery

) आपल्याकडे मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर (न्याहाळक)ची + आवृत्ती असणे आवश्यक. (मोझिला फायरफॉक्सची नविनतम मराठी आवृत्ती .५+ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.)

२) या दुव्यावर जा.

) तेथेInstall Lazarusअसे उजव्या बाजुला बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करा.

) नंतर तुम्हालाफायरफॉक्सने ह्या स्थळास (lazarus.interclue.com) आपल्या संगणकावर सॉफ्टवेअर प्रतिष्ठापन करण्यापासून बंधित केले आहे.” अशी एक संदेश-पट्टी तुम्हाला तेथे दिसेल. त्याच पट्टीवरील “सहमती द्या (A)” हे बटन दाबा.

) नंतर तुम्हालाLazarus: Form Recoveryहे ऍडऑन स्थापन करायचे का ? असा प्रश्न विचारणारी एक पॉपअप विन्डो दिसेल, त्यातील स्थापन करा वर क्लिक करा.

) जेव्हा ते ऍडऑन स्थापित होईल, त्यानंतर तुमचे मोझिला ब्राउजर बंद करून पुन्हा चालू करा.

) आता तुमचे ते ऍडऑन प्रतिष्ठापित झालेले असेल.

) यानंतर एखाद्या ठिकाणी काही तरी लिहा, उदा. एखाद्या ठिकाणी कॉमेंट टाका, आणि ती खोडून टाका.

) आता त्यात आपल्या माउसचे राइटक्लिक बटन दाबून “Recover form” किंवा “Recover text” क्लिक करून तुम्हाला असलेले बॅकअप क्लिक करा. (बाजुच्या चित्रात दर्शविले आहेयाबद्दल….)

१०) आले ना आपले हटवलेले लेखन परत….!!!!!!

११) आता नो झंजट, नो रोनाधोनाओन्लि एन्टरटेन अबाउट बॅक-अपिंग युअर इंपॉर्टंट डेटा…. ऍण्ड ब्रीथ साय ऑफ रिलीफ…….!!!!

आणखी काही शंका, अडचणी?

धन्यवाद!

फायरफॉक्स ह्या स्थळास (lazarus.interclue.com) आपल्या संगणकावर सॉफ्टवेअर प्रतिष्ठापन करण्यापासून बंधित केले आहे.

संबंधित लेखन

 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • टेक मराठी सभा -२
  टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. अतिशय उपयुक्त माहीती दिलीस त्याबद्दल धन्यवाद विशाल. लगेच करून बघतो.

  • जरूर वापरून पाहा दादा हे ऍड-ऑन! ट्विटरचे इकोफोन हे मोझिला ऍड-ऑन क्लाएंट जसे तू वापरतोस, तसेच याचीही तुला सवय पडून जाईल!

   मी जेव्हापासून फायरफॉक्स वापरायला सुरू केलंय, तेव्हापासून हे ऍड-ऑन वापरतो… याची मला एवढी सवय झालीय की मी खुप निष्काळजीपणाने कुठेही कितीमोठे लिहिलेले डिलीट करून टाकतो… माझ्या लॅपीवर (विन्डोज आणि उबुण्टूवर) हे ऍड-ऑन असल्यामुळे मी कधीही ते डिलीट केलेले लेखन पुन्हा प्राप्त करू शकतो. पण जर इतर ठिकाणी असं जेव्हा घडतं, तेव्हा मात्र मला फारच राग येतो.. कारण Lazarus नसल्यामुळे माझा उडालेला डेटा मला कोणत्याही प्रकारे रीकव्हर करता येत नाही!

 2. धन्यवाद ….चांगली माहिती दिलीस. मी लगेच install केले .
  तसेच मी सध्या scorewatch आणि videodownload helper हे ad on सुद्धा वापरतो.
  ती दोन्ही सुद्धा छान आहेत. अजून काही असतील तर लिही.

  • सतिश,

   माझ्या फायरफॉक्सवर कायमस्वरूपी असलेल्या ऍड-ऑन्सची यादी खालीलप्रमाणे (संकालन केल्यामुळे मी कधीच लक्षात ठेवत नाही, दुसर्‍या अनोळख्या संगणकावरील फायरफॉक्सवरही मी ही यादी संकालित करू शकतो):

   यादी अल्फाबेटिकली आहे:

   १) 1-Click Youtube Video Downloader
   २) Adblock Plus (जरूर वापरा – ऍड्सच्या नाहक पॉप-अप्स ना आळा घालण्यासाठी)
   ३) Better GReader (गुगल रीडरमध्ये काही शिल्लकची वैशिष्ट्ये)
   ४) Better Privacy (जरूर वापरा)
   ५) Bindwood
   ६) ChatZilla (IRC साठीचा फायरफॉक्स क्लाएन्ट)
   ७) Download Manager Tweak
   ८) Download Statusbar
   ९) Echofon (माझा सगळ्यांत आवडता ट्विटर क्लाएन्ट)
   १०) Fast Dial
   **) Fire Bug (वेब डेव्हलपर्सचे आवडीचे ऍड-ऑन)
   ११) Firefox Sync (मोस्ट रिकमण्डेड: तुमचे बुकमार्क्स, इतिहास, टॅब्स, पासवर्ड्स इत्यादी जगातल्या कोणत्याही फायरफॉक्सवर संकालित/सिन्क्रोनाईज करण्यासाठी)
   १२) FireFTP (एफटीपी साठी मोझिलाचा क्लाएन्ट)
   १३) FireFTP button
   १४) Glydo (तुम्ही सध्या जे पेजेस/माहिती/ट्विट्स/व्हिडिओज/फोटोज पाहता आहात, त्याच्याशीच रिलेटेड माहिती लगेच दाखवते)
   १५) Gmail Notifier
   १६) Google Shortcuts (गुगलचे सगळे प्रोडक्ट्स, एकाच ऍड-ऑनमध्ये, मी यातील goo.gl ही लिंक शॉर्टनर सुविधा जास्त वापरतो)
   १७) Lazarus: Form Recovery (हा लेख याच ऍड-ऑनसाठी लिहिला आहे!)
   १८) Personas (फायरफॉक्ससाठी शेकडो थीम्स, एका क्लिकसह थीम अप्लाय होते)
   १९) Personal Rotator
   २०) Power Twitter (ट्विटरच्या ऑफिशिअल वेबपेजवरच काही शिल्ल्कचे फिचर्स आपोआप जोडते)
   २१) Pramukh Type Pad (गरज नाही, पण कोणतीच इनपुट मेथड उपलब्ध नसेल, तर बराहा स्टाईलमध्ये F12 ने टॉगल करून मराठी/इंग्रजी लिहिण्यासाठी)
   २२) RSS Ticker (सबस्क्राईब केलेल्या वेगवेगळ्या साईट्सच्या फीड्स बातम्यांच्या चॅनेल्सवर दिसते तश्याप्रकारे नविन अपडेट्स स्क्रॉल करते)
   २३) Tab Preview (कोणत्याही टॅबवर प्रत्यक्ष न जाता नुसता माऊस पॉईंटर हॉवर केला की पेजवर किती आणि काय लोड झालंय याचा प्रिव्ह्यू दर्शवते)
   २४) Twitter Links
   २५) WOT (मोस्ट रिकमण्डेड)

   आणखी बरेच आहेत, पण ते Firefox Sync जोडण्याअगोदरचे होते, त्यामुळे आता लक्षात नसल्यामुळे जोडलेले नाहीत, गरज पडल्यास इथे नमूद करीन!

   तुमच्याही आवडीचे काही ऍड-ऑन्स असतील तर जरूर कळवा!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME