वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

T9 चा फंडा !

८ प्रतिक्रिया
T9 चा फंडा !

T9 चा फंडा !

मोबाईल (तसे कोणेतेही उपकरण) घेतला की मी त्याचे मॅन्युअल वाचून काढतो। मला मग तो कसा हाताळावा हे व्यवस्थित समजते.

मी वाचतो म्हणून माझे सहकारी आपला बहूमूल्य वेळ वाया घालवत नाहीत व स्वत:चा मोबाईल माझ्या पायावर ठेउन मोकळे होतात ! लोकांना मोबाईल वापरायला शिकवणे हा माझ्या कामाचा जणू भागच झाला होता !

कधी कधी मी कामावर येण्या आधी लोक आपले मोबाईल घेउन दारात उभे असत आणि कार्यालयीन कामे उरकण्याआधी मला त्यांची शिकवणी घ्यायला लागायची ! मोबाईल मध्ये SMS पाठवण्यासाठी T9 असा काही प्रकार असतो, पण तो मात्र मला अजिबात जमत नसे. त्याने म्हणे इंग्रजीमध्ये टाइप करणे खूप सोपे जाते. मी अनेक वेळा प्रयत्न करून बघितला पण लिहायचे असायचे एक, आणि उमटायचे भलतेच , त्यामुळे काहीतरी ‘बग’ असावा असे वाटून मी तो नाद सोडून दिला व पारंपारीक पद्धतीनेच संदेश पाठवत असे.

उदा. मला लिहायचे आहे write तर ९ आणि ७ चे बटण दाबले की yr उमटायचे आणि ‘हे काय भलतेच’ असे म्हणून मी ते abort करायचो !

एकदा असाच कामावर जात असताना लोकल बंद पडल्या. जो तो मोबाईल काढून कामावर SMS पाठवून उशीर होत असल्याचे कळवू लागला. मी आणि माझ्या समोरचा आम्ही एकदमच ‘टायपायला’ सुरवात केली. त्याने SMS पाठवला सुद्धा , मी आपला बटणे शोधत , परत परत दाबत बसलो होतो.

“Trains are running late, i will be late” हाच संदेश त्याने पण पाठवला होता. मी त्याला विचारले की एवढ्या पटकन कसे टाइप केले तुम्ही ? त्याने हसून ‘T9’ असे सांगितले. “तुम्हाला पण करता येईल, सोपे आहे!”

मी प्रयत्न करू लागलो, टी साठी ८ अंक दाबला, t उमटले पण मग आर साठी ७ दाबताच त्याचे up झाले ! मी त्याला ते दाखवले व म्हणालो, बघा, हा असा problem आहे ! तो म्हणाला “काही problem नाही आहे, आता a साठी २ नंबरचे बटण दाबून तर बघा !”. आणि काय आश्चर्य, आता पडद्यावर tra असे दिसत होते !

बर्‍याच वर्षाने का होईना माझी ट्यूब पेटली तर ! T9 चा फंडा मला कळला ! आपले अर्धे कॉल आपण SMS करून वाचवू शकतो व त्या प्रमाणात मोबाईलचे बिल सुद्धा ! T9 वापररून SMS टाइप केलात तर बराच वेळ वाचतो आणि बर्‍यापैकी सविस्तर, लगेच कळेल असे लिहीता येते. “trains are running late” हे वाक्य t9 वापरून लिहील्यास तुम्हाला फक्त २३ वेळा बटणे दाबावी लागतील आणि जर पारंपारीक पद्धतीने केल्यास तब्बल ४२ वेळा तुम्हाला बटणे दाबावी लागतील !

T9 चा अजून एक फायदा म्हणजे स्पेलींग मिस्टेक कमी होतात, निदान आपले काहीतरी चूकते आहे हे तरी कळते. एकादा मला anniversary हा शब्द लिहायचा होता. त्याचे स्पेलींग मी आधी anniversory केले ते जमेना, मग anniversery केले तरी चूक ! शेवटी शब्दकोष काढला तेव्हा चूक समजली !

थोड्याच काळात मी या तंत्रात चांगलाच पारंगत झालो, मित्रांना लंबे चवडे मेसेज पाठवून मी त्या काळात अगदी वात आणला होता.

एकदा एखादे खूळ माझ्या डोक्यात शिरले की शिरले…मी पार T9 मय होउन गेलो होती त्या काळात “जे जे आपणासि ठावे, ते ते दूसर्‍यास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन॥” या उक्तीप्रमाणे मी ज्याला त्याला हा वसा देउ लागलो. कोणी SMS टाइप करताना दिसला रे दिसला, की तो ओळखीचा असो की नसो, मी लगेच त्याला T9 चा वसा देउ करे….. अट एवढीच, त्याने सुद्धा निदान एकाला तरी हा वसा द्यायचा आणि हीच अट घालून ! तुम्ही वापरता का T9 ?

मग मला “read your new article” असा मेसेज मला सगळ्यात आधी कोण पाठवते ते बघूच ! माझा मोबाईल नंबर आहे 9987030637 !

संबंधित लेखन

 • आंतरजाल (Internet) – भाग १

  तंत्रज्ञान शाखेचा आवाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेतील व्यक्तीला तंत्रज्…
 • आंतरजाल (Internet) – भाग २

  १) मोडेमः
  मोडेम (MODEM) हा शब्द MOdulator आणि DEModulator यांचे मिळून संक्षिप्त रुप आहे. साम…

 • टेक मराठी सभा -२
  टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्…
 • उबुन्टू १०.१०
  परिचय-ओळख
  उबुन्टू १०.०४ नंतर, म्हणजे ६ महिन्यांनंतर कॅनॉनिकलने १० ऑक्टोबरला आपली नवीन आवृत्ती बा…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

PG

एकनाथ मराठे

मी आहे तरी कसा या प्रश्नाचे उत्तर मलाच सापड्त नाही ! मन मनास उमगत नाही ! गेली अनेक वर्ष हा आत्मशोध चालू आहे, माझ्यातला “मी”च मी शोधत आहे ! एक मात्र खरे, जीवन नौका भरकटत आहे, पण खडकावर आपटून फूट्ली नाही की गाळात रूतली नाही!

 1. मस्त. मी सुध्दा T9 ‘काय वैताग आहे!’ म्हणुन सोडुन दिलेले आहे, पण आता तुम्ही म्हणतच आहात, तर बघतो एखादा प्रयत्न करुन 🙂

  माहीतीबद्दल धन्यवाद

 2. हे हे ऽऽऽ.. 😉 एकदम ग्रेट राव.. आम्ही नोकियावाले (वापरणारे) इंग्रजी सोडून आपल्या मातृभाषेत (मराठीतच) T9 चा फंडा वापरतो (कारण मराठी युनिकोड सपोर्ट असतोच नोकिया मध्ये!), त्यात कित्येक शब्द नसतात, स्वतःहून ते शब्दकोषात जोडले की नंतर त्यांचाही T9 द्वारे मस्त उपयोग होतो…

  बाय द वे, तुम्हाला जरा खुपच उशिरा कळलेलं दिसतंय हे, हरकत नाही, तुमच्या या लेखामुळे कित्येकांना लवकर कळेल अशी आशा आहे!

 3. सहि रे, मल पन समजले कि टि 9 चा काय फन्दा अहे तो, पन मला मराथी लिहता येइना थिक काय करु

 4. You people have given great info in marathi about ubuntu.

  I hope that you will guide normal user following.

  1. How to type phonetically using ubuntu. [ aka Marathi ime ]

  2. Alternative to varous windows software.

  • गणेश,

   १) SCIM, iBus या IME पद्धती वापरून तुम्ही उबुन्टू वर अगदी विन्डोज वरील बराहाप्रमाणे फोनेटिकली किंवा इन्स्क्रिप्ट मध्ये टंकलेखन करू शकता.
   २)
   – मायक्रोसॉफ्ट ऑफिस ~ ओपन ऑफिस डॉट ऑर्ग,
   – Nero ~ Brasero/Nautilus CD/DVD creator
   – iTunes ~ Rythmbox
   – Adobe Photoshop ~ GIMP
   हे इनबिल्ट मिळणारे आहेत (GIMP नाही इनबिल्ट), पण तुम्हाला गरज असलेले विन्डोजचे सॉफ्टवेअर्स सांगा, मी त्यांना पर्यायी असणारे उबुन्टू साठीचे डेबिअन पॅकेजेस सांगतो.

   धन्यवाद!

 5. राजेश जी. गाडे म्हणतात:

  आपल्या लेखाच्या निमित्ताने T9 चा वापर करण्याचा प्रयत्न केला विशाल तेलंग्रेंच्या सौजन्याने हाच T9चा फंडा मराठीसाठी वापरण्याचा आणि मराठीत शब्द तयार करुन ते शब्दकोषात जोडून ठेवण्याचा आणखी एक फंडा शिकायला मिळाले.

  राजेश जी. गाडे
  संस्थापक व मुख्य संयोजक
  आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
  9820440573/9869240573

 6. हे ऽऽऽ.. एकदम ग्रेट राव.. आम्ही नोकियावाले (वापरणारे) इंग्रजी सोडून आपल्या मातृभाषेत (मराठीतच) T9 चा फंडा वापरतो (कारण मराठी युनिकोड सपोर्ट असतोच नोकिया मध्ये!), त्यात कित्येक शब्द नसतात, स्वतःहून ते शब्दकोषात जोडले की नंतर त्यांचाही T9 द्वारे मस्त उपयोग होतो…

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME